आज मला लहाणपणीचे पेण य़ा गावचे गणपति आथवले.मि लहानपणी पेण ला होतो.पेण हे गणपति बनविण्यासाथि प्रसिद्ध आहे. आम्हि चाळी मध्ये रहात होतो .त्यामुळॆ प्रत्येक घरात गणपति असायचे.आणी आम्हि सर्व लहान मुले प्रत्येकाचा गणपति आणायला नटून थटून जायचो.आणी प्रत्येक वेळी जोर जोरात गणपतिचा जय जय कार करायचो. दर वेळॆला आमच्या घॊशणा वेगवेगळ्य़ा असायच्या.आरत्या साथि प्रत्येक घरातुन आमन्त्रण असायचे.मन्त्र पुश्पानजलि तर कोण जोरात बोलतोय याचि स्पर्धा असायचि.सर्व मित्र रात्र जागविन्यासाथि एकत्र यायचे.तो आनद वेगळाच असायचा.सर्व मित्र मिळून आम्हि गणपति दर्शनासाथि सर्वान कडॆ जायचो.
आम्हि तर घरचे गणपति आणल्या वर वडीलानच्या ओफ़िसचा गणपति आणायला पळाय़चो.तो सुद्धा आम्हि वाजत गाजत आणयचो.
गणपति चे दहा दिवस कसे आन्दात जायचे. आता पुन्हा लहान होऊन गणपति उत्सव साजरा करावा असे वाट्ते.